
साप्ताहिक सातारा दर्शन
सातारा : “यशाचा नवा मंत्र… शिवतंत्र” या प्रेरणादायी पुस्तकाचा अनावरण सोहळा श्री.छ. खा. उदयनराजे यांच्याहस्ते जलमंदिर पॅलेस येथे पार पडला. डॉ. विजय तानपुरे यांनी लहानपणी २ वर्षांचे असताना पोलिओमुळे पाय गमावले, तरीही आयुष्याच्या प्रत्येक अडथळ्यावर मात करत, गेली ३८ वर्षे महाराष्ट्रात व विदेशात कीर्तन, पोवाडे व व्याख्यानांद्वारे समाजप्रबोधन करत आहेत.
त्यांनी उभारलेले ४२०० चौ.फु.चे “शिवाश्रम” हे अपंग बांधवांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.
“शिवरायांचा विचार हा या समाजाला एकत्र ठेवून हा देश एकसंघ ठेवण्यासाठी व आपल्याला एकत्र घेऊन यशाकडे नेणारा मार्ग आहे.”
याप्रसंगी भाजपा लोकसभा संयोजक श्री.सुनील काटकर, श्री.अशोक घोरपडे व तनपुरे कुटुंबीय उपस्थित होते.