सातारा : सातारा मुख्य बसस्थानक येथे श्री. छ. वृषालीराजे यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन व विभागीय कार्यशाळा पार पडली.
सातारा मुख्य बसस्थानक येथे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित साधून श्री. छ. वृषालीराजे यांच्या उपस्थितीत एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांची विभागीय कार्यशाळा संपन्न झाली.
श्री. छ. वृषालीराजे यांनी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन केले. आणि माझ्या परीने योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन वृषाली राजे यांनी दिले.
सुरुवातीला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून करण्यात आली.
या एसटी महामंडळाच्या करण्यात आलेल्या शिवराज्याभिषेक दिन व विभागीय कार्यशाळेस मोठ्या संख्येने विविध अधिकारी कर्मचारी, वृंद उपस्थित होते. मोठ्या हसत खेळत वातावरणात विभागीय कार्यशाळा संपन्न झाली.
सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुरेश जगताप यांनी केले.
