
पाचगणी (महाबळेश्वर) : महाबळेश्वर तालुक्यातील तायघाट, आंब्रळ व पांगारी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संदीप तुकाराम वाडकर व राजेंद्रशेठ राजपुरे युवा मंच याच्यावतीने शालेय उपयोगी साहित्य वाटप करून शालेय मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हातभार लावला. सकाळी अकरा वाजता सर्व उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शालेय विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रम स्थळी प्रमुख पाहुणे माननीय राजेंद्रशेठ राजपुरे साहेब (सहकार रत्न – संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांच्या हस्ते वह्या, पेन, कंपास, चित्रकला वही, रंगीत खडू असे सर्व मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या पायल किरण पारठे (९४.८०%), आर्या अशोक पारठे (८५%), प्राची विठ्ठल पारठे (७५%), स्नेहा विनोद पारठे (७०%) विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला उपस्तिथ असलेले मान्यवर श्री. संभाजी भिलारे (तालुका प्रमुख शिवसेना ), श्री. जाणू पांगारे ( मा. सरपंच पांगरी ), सौ. प्रिया रोहित पारठे ( सरपंच तायघाट), श्री. ज्ञायेश्वर पारठे (ग्रा. सदस्य ), सौ. शोभा तुकाराम वाडकर(ग्रा. सदस्य ), सौ. मयुरी शेखर पारठे (ग्रा. सदस्य ), श्री. महेंद्र पांगारे (शाळा वेवस्थापन समिती पांगरी ), श्री. सुहास भिलारे (मा सरपंच, शाळा वेवस्थापन समिती तायघाट), श्री. आनंदा पारठे (संचालक पांचगणी विकास सेवा सोसायटी ), डॉ. विजय सावंत सर (मुख्याध्यापक तायघाट), सौ. आंब्रळे मॅडम (मुख्याध्यापीका पांगारी), सौ. मोरे मॅडम (मुख्याध्यापीका आंब्रळ), श्री. सखाराम श्रीपती वाडकर, श्री. संदीप सहदेव पारठे, श्री. संतोष पारठे, श्री. अशोक परबती पारठे, श्री. किरण तुकाराम पारठे, श्री. महादेव कृष्णा वाडकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.